अ) चिनमुद्रा प्राणायाम :- वज्रासनात बसावे
१) अंगठा व तर्जनी एकमेकांचे टोक एकमेकांशी जोडलेले असावे . त्यावर थोडासा दाब असावा .आता उरलेली तीन बोटे एकमेकांशी जोडलेली व सरळ राहावीत. हात मांडीवर मध्यरेषेत पालथे ठेवावेत व खांदे सैल सोडावेत .
२) हातांचे कोपरे पोटाच्या बाजूला चिकटलेल्या स्थितीत व शरीर व मान सैल अशा स्थितीत बसावे.
३) या स्थिती बसल्यानंतर पुरक(श्वास घेणे): कुंभक (घेतलेला श्वास रोखून ठेवणे ) : रेचक ( सावकाश श्वास सोडणे) : शून्यक (श्वास सोडल्या नंतर तसेच निष्क्रिय राहणे) अशा क्रमाने हा प्राणायाम ४:२:५:२ (सेकंद) या प्रमाणात सात वेळा करावा.एका वेळी अशी सात आवर्तनाने करावीत .
ब) चिन्मयी मुद्रा परणायाम :- वज्रासनात बसावे
१) अंगठा व तर्जनी एकमेकांस जोडून वर्तुळ तयार करा व यात अंगठ्याचे तर्जनीचे टोक एकमेकांशी जोडलेले असावे .आता उरलेली तीन बोटे पेरांमध्ये दुमडून आतल्या बाजूस वळवून दाबून ठेवावेत .
२) उपरोक्त स्थितीतील तळवे मांडीवर पालथे /मध्यरेषेत ठेवा व कोपरे पोटाच्या बाजूला चिटकलेल्या स्थितीत व खान्दे सैल अशा स्थितीत असावे .
३) या स्थिती बसल्यानंतर पुरक(श्वास घेणे): कुंभक (घेतलेला श्वास रोखून ठेवणे ) : रेचक ( सावकाश श्वास सोडणे) : शून्यक (श्वास सोडल्या नंतर तसेच निष्क्रिय राहणे) अशा क्रमाने हा प्राणायाम ४:२:५:२ (सेकंद) या प्रमाणात सात वेळा करावा.एका वेळी अशी सात आवर्तनाने करावीत .
क) आदिमुद्रा प्राणायाम :- वज्रासनात बसावे
१) दोन्ही हातांचे अंगठे दुमडून करंगळीच्या तळाशी ठेवा व मूठ बंद करा.
२) उपरोक्त स्थितीला हाताची मूठ पालथी मध्यरेषेत मांडीवर ठेवा हाताचे कोपरे पोटाच्या बाजूला चिटकलेल्या स्थितीत व खांदे सैल अशा स्थितीत बसा.
३) या स्थिती बसल्यानंतर पुरक(श्वास घेणे): कुंभक (घेतलेला श्वास रोखून ठेवणे ) : रेचक ( सावकाश श्वास सोडणे) : शून्यक (श्वास सोडल्या नंतर तसेच निष्क्रिय राहणे) अशा क्रमाने हा प्राणायाम ४:२:५:२ (सेकंद) या प्रमाणात सात वेळा करावा.एका वेळी अशी सात आवर्तनाने करावीत .
ड) मेरुदंड रुद्र प्राणायाम :- वज्रासनात बसावे
१) हाताची चारही बोटे तळहातास दुमडलेली व दोन्ही हाताचे अंगठे सरळ आकाशाकडे करा.
२) उपरोक्त स्थितीतील मूठ मांडीवर मध्यरेषेत उभ्या स्थितीत ठेऊन अंगठे शरीराकडे ताणलेल्या स्थितीत राहतील असे ठेवा. कोपरे पोटाच्या बाजूला चिटकलेल्या स्थिती व खांदे सैल अशा स्थित बसा.
३) या स्थिती बसल्यानंतर पुरक(श्वास घेणे): कुंभक (घेतलेला श्वास रोखून ठेवणे ) : रेचक ( सावकाश श्वास सोडणे) : शून्यक (श्वास सोडल्या नंतर तसेच निष्क्रिय राहणे) अशा क्रमाने हा प्राणायाम ४:२:५:२ (सेकंद) या प्रमाणात सात वेळा करावा.एका वेळी अशी सात आवर्तनाने करावीत .
इ) पूर्ण मुद्रा प्राणायाम :- वज्रासनात बसावे
१) दोन्ही हातांचे अंगठे दुमडून करंगळीच्या तळाशी ठेवा व मूठ बंद करा.
२) दोन्ही मुठी एकमेकांशी आतल्या बाजूने जोडून घ्या .दोन्ही मुठी वरच्या बाजूला व पोटाला चिटकून मांडीवर ठेवा .
३) उपरोक्त स्थितीतील मुठीची जोडी छातीपासून शरीराशी घासत जांघेजवळ ठेवा .आता त्याला खालील बाजूस दाब द्या .जेणेकरून खांदे वर उचलले जातील व दोन्ही हात जास्तीत जास्त सरळ स्थितीत राहतील असे बसावे.
४) या स्थिती बसल्यानंतर पुरक(श्वास घेणे): कुंभक (घेतलेला श्वास रोखून ठेवणे ) : रेचक ( सावकाश श्वास सोडणे) : शून्यक (श्वास सोडल्या नंतर तसेच निष्क्रिय राहणे) अशा क्रमाने हा प्राणायाम ४:२:५:२ (सेकंद) या प्रमाणात सात वेळा करावा.एका वेळी अशी सात आवर्तनाने करावीत .
हरी ॐ , तुमचं शरीर उष्ण आहे? उष्णतेचा विकार आहे? उन्हाळा सहन होत नाही? हा प्राणायाम बघा आणि करा. उष्णते पासुन मुक्ती मिळवा. प्राणायाम करा व निरोगी आयुष्य जगा ।। DO AT LEAST 5-7 MINUTES TO GET BEST BENIFITS, WATCH IT , LIKE , SHARE & SUBSCRIBE IT, THANK YOU. FOR DETAILS OF ALL PRANAYAM & ASANS, PLZ VISIT www.homeodietyoga.com, for any assistance plz call on 02532316676/8275854255
भाह्य अभ्यंतर विषयाक्षेपी प्राणायाम
एक साधारण श्वास घ्यावा.
आता श्वास पूर्ण बाहेर सोडा व रोखून ठेवा व थांबा.
श्वास घ्यावा असे वाटत असतानाच पुन्हा श्वास बाहेर सोडा.
आणखी श्वास घ्यावा असे वाटतं असताना पुन्हा श्वास बाहेर सोडा.
पूर्ण श्वास बाहेर गेलेला आहे असे वाटल्यानंतर हि क्रिया थांबवा.
आता संपूर्ण श्वास आत घ्या व थांबा.
आता श्वास सोडावा असे वाटत असताना आणखी जास्त श्वास घ्या.
परत श्वास सोडावा असे वाटत असताना आणखी जास्त श्वास घ्या.
परत श्वास सोडावा असे वाटत असतानाच पुन्हा श्वास घ्या.
पूर्ण श्वास आत घेतला गेलेला आहे असे वाटल्यानंतर हि क्रिया थांबवा.
हे एक आवर्तन झाले. अशी आठ आवर्तने करणे.
हा प्राणायाम करताना नासिक मार्गात घर्षणयुक्त आवाज येतो.
एकूण तीन आवर्तने करावीत.
प्रत्येक आवर्तनानंतर किमान ३० सेकंदाचा आराम करावा.
हि क्रिया करताना त्रास होत असेल (चक्कर, आलास, झोप)तर आपल्या कुवतीनुसार २० ऐवजी १५-१५, १०-१० किंवा ५-५ वेळा वरीलप्रमाणे तीन आवर्तनाने करा.
हा उन्हाळा त्रास दायक आहे ? शरिरात पण खुप उष्णता वाढली ? उन्हाळयामुळे होणारी शरीरात दाह व उष्णतेमुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी एकमेव प्राणायाम ।। हा प्राणायाम करा, उष्णता पळवा आणि निरोगी आयुष्य जगा ।। हरी ॐ , DO AT LEAST 5-7 MINUTES TO GET BEST BENEFITS, WATCH IT , LIKE , SHARE & SUBSCRIBE IT, THANK YOU. FOR DETAILS OF ALL PRANAYAM & ASANS, PLZ VISIT www.homeodietyoga.com, for any assistance plz call on 02532316676/8275854255