लीकोरिया हा योनीतील स्राव आहे. या स्रावाचे दोन प्रकार आहेत:फिजियोलॉजिकल (सामान्य) - सामान्य स्राव ज्यामुळे खाज येत नाही किंवा दुर्गंध येत नाही. पॅथोलॉजिकल (असामान्य) - खूप जास्त प्रमाणात स्राव होतो, ज्यामुळे खाज येऊ शकते किंवा दुर्गंध येतो. रंग आणि स्रावाच्या घट्टपणातही बदल दिसतो.